आई, माझा शैक्षणिक खर्च खूप, तू ताण घेऊ नकोस…; महिला पोलीस अंमलदाराच्या मुलीचं टोकाचं पाऊल; ना
नाशिक गुन्हेगारी बातम्या: “आई, तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च खूप आहे. तू ताण नको घेऊ, तुझी माझ्यामुळे धावपळ होते,” अशा हृदयद्रावक चिठ्ठीतून आपल्या भावना व्यक्त करत एका 20 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik News) उघडकीस आली आहे. पूजा डांबरे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून, ती नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.
पूजाची आई नाशिक पोलीस (Nashik Police) दलात कार्यरत असून, तिची नेमणूक अंमलदार म्हणून झाली आहे. पूजाचे वडील व आई यांच्यात विभक्तपणा असल्याने ती आईसोबत राहत होती. मात्र आईच्या ड्युटीच्या तासांमुळे आणि कामाच्या स्वरूपामुळे पूजाला आईकडूनही पुरेसा वेळ मिळत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती सतत नैराश्यात होती.
नाशिक पोलीस दलात खळबळ
पूजाने लिहिलेल्या चिठ्ठीतून तिने शिक्षणाचा वाढता खर्च, आणि त्यामुळे आईवर होणारा ताण याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तिला तिच्या आईच्या धावपळीमुळे मन:स्वास्थ्य लाभत नव्हते. या सर्व कारणांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना नाशिकच्या आडगाव परिसरातील असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली असून, सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नाशिकच्या हॉस्टेलमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
दरम्यान, नाशिकच्या शरणपूर रोड येथील तिबेटीयन मार्केट जवळ असलेल्या एका खाजगी हॉस्टेलमध्ये खोलीत गळफास घेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. सोळा वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचा तपास पोलीस करत आहे. ही तरुणी मुळशी अहिल्यानगरची रहिवाशी होती. गेल्या दोन महिन्यापासून ती नाशिकच्या एका खाजगी होस्टेलमध्ये राहत होती. मागील दोन महिन्यांपासून ती या ठिकाणी राहत होती. तिने नीटच्या परीक्षेसाठी शहरात एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच ती अकरावीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शरणपूर येथील तिबेटियन मार्केटजवळ गौरव पार्क नावाची इमारत आहे. येथे फ्लॅटमध्ये मुलींसाठी असलेल्या वसतीगृहात ती अल्पवयीन मुलगी राहत होती. हिने पंख्याला ओढणी बांधली आणि गळफास घेतल्याचे आढळून आले. ही बाब लक्षात येताच अन्य विद्यार्थिनींनी व होस्टेल मालकाच्या मदतीने तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.