उंच भिंती, सीसीटीव्ही अन् सुरक्षा… तरीही ‘माल’ पोहोचला आत, नाशिकरोड जेलमधील प्रकाराने खळबळ, नेम

नाशिक क्राईम न्यूज : राज्याची सुरक्षा यंत्रणा आणि कारागृह प्रशासनासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) सध्या एका गंभीर आणि धक्कादायक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. कारागृहाच्या कडेकोट सुरक्षेला सुरुंग लावत आतमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

कारागृहातील मंडल क्रमांक 7 मध्ये कैद्यांकडून तब्बल 1 लाख 7 हजार 800 रुपये किमतीचे अमली पदार्थ तसेच अमली पदार्थ सेवनासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दोन कैदी आणि एका अज्ञात इसमाविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: नेमकी घटना काय?

10 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 9 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात नियमित तपासणी सुरू होती. यावेळी मंडल क्रमांक 7 मधील यार्ड क्रमांक 1 आणि 4 येथे काही कैद्यांच्या संशयास्पद हालचाली कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आल्या. तपासणी पथकाने संशयावरून बंदी दिलीप कचरू सोळुंके याची सखोल झडती घेतली असता, त्याच्याकडे सापडलेला अमली पदार्थांचा साठा पाहून अधिकारीही अवाक झाले.

Nashik Crime News: सव्वा लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत

झडतीदरम्यान दिलीप सोळुंके याच्याकडून 104 ग्रॅम चरस, 31.5 मिलीग्रॅम गांजा सदृश पदार्थ, 4 मिलीग्रॅम एम.डी., तसेच अमली पदार्थ सेवनासाठी लागणारे 15 रोलिंग पेपर, असा एकूण 1,07,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nashik Crime News: बाहेरील व्यक्तीच्या मदतीने तस्करी? धक्कादायक खुलासा

प्राथमिक तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वप्नील दिनेश उन्हवणे याच्या सांगण्यावरून एका बाहेरील अज्ञात व्यक्तीने हे अमली पदार्थ अत्यंत बेकायदेशीर मार्गाने कारागृहाच्या आत पोहोचवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Nashik Crime News: सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कारागृहाच्या उंच तटबंदी, कडक पहारा आणि नियमित तपासणी असतानाही हे अमली पदार्थ कारागृहाच्या आत पोहोचलेच कसे, हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित झाला आहे. या प्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करीमागे कारागृहातील अंतर्गत कोणाचे संगनमत आहे का? की हे अमली पदार्थ भिंतीवरून फेकण्यात आले, किंवा कच्च्या कैद्यांच्या माध्यमातून आत नेण्यात आले, याबाबत सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Sinnar Nagarparishad Election 2025: भावाच्या नावावर मतदानाचा प्रयत्न फसला, बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात; नाशिकच्या सिन्नरमधील खळबळजनक घटना

आणखी वाचा

Comments are closed.