लग्नानंतर रक्त न आल्यानं संशय घेतला, मासिक पाळीवेळी पॅडला हात लावला; नाशिकमधील विवाहितेची अंगाव
Nashik Crime News नाशिक: नाशिकच्या हिरावाडी परिसरातील एक धक्कादायक घटना (Nashik Crime News) समोर आली आहे. चारित्र्यावर संशय आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या नवविवाहितेने विषप्राशन करून जीवन संपवलं आहे. पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रासाला कंटाळून नेहा पवार या नवविवाहितेने लग्नानंतर 6 महिन्यातच संपवलं जीवन संपवलं. पोलीस आणि भावाच्या नावे 7 पानांची सुसाईड नोट लिहून नेहा पवारने आत्महत्या केली. नेहा पवारच्या सुसाईड नोटवरुन नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहा पवारने 7 पानांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. यामध्ये लग्न झाल्यानंतर नवऱ्याने शारिरीक संबंधानंतर सील ब्लड निघाले नाही, म्हणून 15-20 दिवस संशय घेतला. मात्र नंतर सील ब्लड निघाले तेव्हा तो शांत झाला, असा आरोपही नेहाने सुसाईट नोटमध्ये केला आहे. 6 सप्टेंबर 2025 रोजी मासिक पाळी आली होती. पण माझ्या सासूला शंका आली की खोटं बोलते, म्हणून माझ्या नंदेला सासून सांगितले की, तिला पॅड लावून तापसून बघ…यानंतर नंदेनेही मला खरंच पॅड लावून तपासले. इतकेच नव्हे तर माझ्या नवऱ्याने देखील पाळी आली की नाही, तपासल्याचं नेहा पवारने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
सुसाईड नोटमध्ये काय काय? (Nashik Crime News)
‘माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून, माझे लग्न 4 जून 2025 रोजी रेशीमबंध बँक्वेट हॉलमध्ये झाले. 10 मार्चला सुपारी फोडल्यावेळी माझ्या सासरच्यांनी म्हटले की, हुंडाप्रथा बंद आहे. तरी तुम्ही नवरदेवास त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी, पाच भांडे द्या. त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरचे भांडण करीत नाही पण, मानसिक त्रास देतात.’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. ‘मोबाइलवर सारखी बोलते, घरकाम येत नाही, पतीला उलटसुलट सांगते. सिलिंडर टाकी एक महिन्यातच संपते. पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध असून, पतीने तिला दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेरहून 20 हजार रुपये आणून दिले. दिवाळीसाठी 15 दिवस माहेरी पाठवले. मात्र, दहाव्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला. भाऊ सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवत आहे. माझे नशीब खराब असून, मला सासर चांगले मिळाले नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे’, असेही तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
माझ्या घरच्यांनाही माझ्याविरोधात भडकवण्यात आलं- (Nashik Crime News)
एक नणंद माहेरी येऊन बसली आहे. तिच्यासह तिच्या मुलांचंही करावं लागतं, नंणंदा, नवरा, सासूचे कान भरतात, त्यावरुन घरात मानसिक छळ केला जात असल्याचंही तिने नोटमध्ये लिहिलं आहे. ती काहीच काम करत नाही, सतत मोबईलवर असते, माहेरच्यांशी सारखी गप्पा मारत असते असे कान भरतात. माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली. 15 लाख रुपये देऊन माझ्या भावाने लग्न लावलं, माझ्या नवऱ्याची परिस्थिती खराब आहे असं दाखवण्यात आलं, म्हणून मी माझ्या माहेरातून 20 हजार रुपये मदत आणून दिली. ते दिले नसते तर त्यांनी अजून छळ केला असता अशी भीती सतत मनात होती. माझ्या घरच्यांनाही माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. नांदायला आल्यापासून नवऱ्याने दोन वेळा मारलं. आईवरुन शिवीगाळ करतो. इतकंच नाही तर माहेरी तुझा कोणी यार ठेवला असेल असे सतत बोलून चारित्र्यावर संशय घेत होता असंही नवविवाहितेनं म्हटलं आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.