पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडल

नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यातील व्यापाऱ्याचा पोलीस असल्याचे सांगत अपहरण करून छळ केल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) तिघाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव जब्बार तांबोळी आहे.

Nashik Crime News: अपहरण आणि खंडणीसाठी आखलेला कट

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जब्बार तांबोळी हे पिकअप वाहनातून गुजरातमधून गुटखा भरून अभोणामार्गे देवळ्याकडे येत होते. देवळा-कळवण रस्त्यावर, भऊर फाटा परिसरात, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले आणि पोलिस महानिरीक्षकांचे पथक असल्याचे सांगून 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीसाठी व्यापाऱ्याचा मुलगा आणि काही ग्रामस्थ ठेंगोडा अरिसरातील नर्सरीजजवळ रक्कम घेऊन पोहोचले. अखेरीस, तडजोडीने 11 लाख रुपये खंडणी देण्याचे ठरले.

Nashik Crime News: व्यापाऱ्याच्या छातीत दुखू लागले आणि दुर्दैवी मृत्यू

खंडणी देण्याच्या प्रक्रियेदरम्यान जब्बार तांबोळी आणि संशयितांमध्ये वाद झाला. त्यावेळी जब्बार यांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि ते बेशुध्द पडले. बेशुध्द झाल्यानंतर संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. बेशुध्द अवस्थेत असलेल्या जब्बार तांबोळी यांना तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Nashik Crime News: तिघा संशयितांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक आणि महेश भामरे या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सखोल तपास सुरु केला असून, अपहरण आणि खंडणी प्रकरणातील इतर तपशीलही उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Nashik News: येवल्यात भटक्या कुत्र्यांचा वृद्धावर हल्ला

दरम्यान, येवला शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास पुन्हा एकदा समोर आला असून भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका वृद्ध नागरिकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी अचानक एका वृद्ध नागरिकावर झडप घातली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात संबंधित वृद्ध जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत वृद्धाची सुटका केली. जखमी वृद्धाला तातडीने येवला येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी वाचा

Nashik Crime News: दोघांच्या प्रेमात अडथळा; मुस्काननं प्रियकरासोबत रचला भयानक प्लॅन, डंबेल्स बांधून नवऱ्याला नदीत फेकलं अन्…; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.