नाशिक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कमालीची सावध; घेतला मोठा निर्णय
नाशिक गुन्हे भाजपा: नाशिक शहरात सध्या सुरू असलेल्या पोलिसांच्या (Nashik Police) धडक मोहिमेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) काही स्थानिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर भाजपने पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या राजकीय व्यक्तींवर कारवाई होत असल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर भाष्य करत, “कोणत्याही पक्षाचा असला तरी गुन्हेगाराला गय केली जाणार नाही,” असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक भाजप आता कमालीची सावध झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Nashik Crime BJP: भाजप कमालीची सावध
नाशिक शहर भाजपचे अध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी सांगितले की, “पक्षाच्या नावाचा किंवा पदाचा वापर करून जर कोणी दादागिरी, गुंडगिरी, फसवणूक, किंवा अन्य कुठलीही बेकायदेशीर कृत्ये करत असेल, तर त्याविरोधात भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात थेट तक्रार करावी.” तक्रारींची शहानिशा करण्यात येईल आणि जर आरोप सिद्ध झाले, तर अशा व्यक्तींना पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे तिकीट नाकारले जाणार असल्याची माहिती देखील सुनील केदार यांनी दिली आहे.
Nashik Crime: पंचवटीत युवकावर हल्ला, नागरिकांनी हटकल्याने वाचला जीव
दरम्यान, नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकातील कोमटी गल्लीत भरदिवसा दुचाकीहून आलेल्या संशयिताने एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना काल (दि. 13) दुपारच्या सुमारास घडली. काही नागरिकांनी हटकले म्हणून यात युवक बचावला असून कुठलीही गंभीर इजा झालेली नाही. सदर घटनेचा थरार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संशयित फरार झाल्याने सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलमध्ये चित्रण झालेल्या व्हिडीओ माध्यमातून दोघा हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय. काल दुपारी एक युवक पळत गजानन चौक कोमटी गल्लीत आला. त्याचा पाठलाग करत दोघे संशयित दुचाकीहून आले. या मार्गाहून जाणाऱ्या दोन मुलींना धडक देत, स्कूल व्हॅनला देखील दोघा संशयितांनी धडक दिली. पळणाऱ्या युवकाला रस्त्यातच गाठले व दुचाकीहून एका संशयिताने उतरत धारदार शस्त्राने युवकाच्या पोटावर वार केला. मात्र नागरिकांनी वेळीच हटकल्याने युवकाचा जीव वाचला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.