नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांच
नाशिक गुन्हे: दिवाळीच्या (Diwali 2025) सणात आनंदासोबतच नागरिकांच्या शांततेत विघ्न आणणाऱ्यांना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) चांगलाच धडा शिकवला आहे. शहरातील एका रहिवाशाच्या घरासमोर फटाके फोडून त्रास देणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. वैभव चोथे आणि सुमित डोकफोडे असे संशयित आरोपींचे नावे आहेत.
Nashik Crime: फटाके फोडल्याने वाद; दगडफेक करून वाहनांचे नुकसान
प्राथमिक माहितीनुसार, दिवाळी सणानिमित्त हे दोघे आरोपी एका नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडत होते. यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांनी आरोपींना विनंती केली की, “कृपया दुसरीकडे जाऊन फटाके फोडा.” मात्र, या सूचनेचा राग येऊन आरोपी पुन्हा त्याच ठिकाणी येऊन मोठ्या आवाज करत फटाके फोडू लागले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी संतापाच्या भरात दगडफेक करत संबंधित नागरिकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik Crime: दोघे आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. आरोपी दारूच्या नशेत असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी पोलीस चौकशीत कबूल केले आहे की, “दारूच्या नशेत ही चूक घडली असून, यापुढे अशी चूक पुन्हा करणार नाही.” नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. यापुढे अशी चूक करणार नाही, असे देखील आरोपींनी म्हटले आहे.
Nashik Crime Pavan Pawar: खंडणी प्रकरणी पवन पवारवर गुन्हा दाखल
दरम्यान, जेलरोड येथील शिंदेसेनेचे माजी नगरसेवक पवन पवार वाच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून 71 वर्षीय वृद्धाला जबदरस्तीने गाडीत डांबून जीवे मारण्याची धमकी देऊन बँकखात्यातून 20 लाख रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पवन पवारसह विशाल पवार, कल्पेश किरवे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, जेलरोड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
एप्रिल 2023 साली नवीन सिडको भागात राहणारे 71 वर्षीय फिर्यादी यांच्या घरी संशयित आरोपी पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार, कल्पेश किर्वे यांनी धमकावले. चाकूचा पाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काळ्या रंगाची काच असलेल्या मोटारीत बळजबरीने डांबून त्यांना बँकेत नेण्यात आले. अंबड येथील बँक शाखेत घेऊन जात तेथे खात्यातून 20 लाख रुपये काढण्यास भाग पाहून ती रक्कम पवार बंधूनी स्वतःच्या ताब्यात घेत हडपल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.