मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
नाशिक गुन्हा: नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने इगतपुरीत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्याच्या टाकेद बुद्रुक येथील शाळेत सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षक गोरख जोशी याने मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या घरी पाठवले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले.
मुख्याध्यापक, वर्गशिक्षकाला अटक
अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी मुलीला विचारले असता पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले. घोटी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पेठरोड परिसरात मुलीवर अत्याचार
दरम्यान, पेठरोडवरील सुळेवाडी परिसरात एका युवकाने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोक्सोअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोटल्या उर्फ भाउसाहेब काबू तांदळे (रा. सुळेवाडी, मखमलाबाद) याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या घरात मुलगी एकटी असताना तिच्या घरात जाऊन अत्याचार केला. यावेळी मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने आरडाओरडा केला असता संशयित गोटल्या उर्फ भाऊसाहेब हा पळून गेला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
अधिक पाहा..
Comments are closed.