पुतण्यानंतर काका सुनील बागुलही नाशिक पोलिसांच्या रडारवर, खंडणी प्रकरणात श्रमिक संघटनेचे नाव; ने
नाशिक क्राईम सुनील बागुल विसेमळा गोळीबारप्रकरणात रामवाडीतील ‘बागुल गँग’वर धडक कारवाई झाली असतानाच, आता एका खंडणी उकळल्याच्या प्रकरणात थेट भाजपाचे नेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांच्या ‘श्रमिक माथाडी गार्ड बोर्ड संघटनेचे नाव समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून बागुल गँगचा अनिल राजाराम शेंडगे याने श्रमिकच्या नावाखाली ‘दुकानदारी’ चालवून ‘सीटी सेंटर’ मॉलमधील अनेक शोरुम व दुकानचालकांकडून दरमहा हजारांची खंडणी उकळल्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेंडगेला अटक झाली असून सुनील बागुलांचे पोलीस (Nashik Police) आयुक्त कार्यालयात वारंवार दर्शन होत असल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते.
रामवाडी ते विसेमळा मार्गावर 25 सप्टेंबर रोजी व्यावसायिक सचिन साळुंके याच्यासह कारवर ‘गोळीबार’ केल्यासंदर्भाने रामवाडीतील बागुल गँगचे संशयित अजय दिलीप बागूल, सागर सुधाकर बागुल, गौरव सुधाकर बागूल, प्रेमकुमार दत्तात्रय काळे, वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे, मामा उर्फ बाबासाहेब वाल्मिक राजवाडे, अमोल भास्कर पाटील, संदीप रघुनाथ शेळके, बाब्या उर्फ सचिन सुखलाल कुमावत, पप्या उर्फ दिलीप जाधव, अजय जेठालाल बोरीसा (सर्व रा, पंचवटी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
Nashik Crime Sunil Bagul: सुनील बागुलांची चौकशी होणार?
यानंतर तपासाची कडी जुळवून संशयितांना अटक करुन दिवाळीपूर्वी ‘सचबोल’चे फटाके वाजविले. विशेष म्हणजे, नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हा पॅटर्न सर्वच संशयितांच्या तोंडी वदवून घेत गुन्हेगारांना ‘दणका’ दिला होता. आता मात्र, एका खंडणीप्रकरणामुळे थेट भाजपा नेते सुनील बागुल यांच्या संघटनेचेच नाव आल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बागुलांच्या एकूण संघटनांसह त्यांचे ‘साम्राज्य’ नेस्तनाबूत होण्याची शक्यता असून या प्रकरणाच्या तपासानंतर बागुल यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
Nashik Crime Sunil Bagul: नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, सुधीर सालेयन (रा. आनंदविहार, सावरकर नगर, नाशिक) या व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, 15 एप्रिल 2024 पासून आतापर्यंत अनिल शेंडगे (वय 33, रा. मोरेमळा, मखमलाबाद रोड, पंचवटी) याने कॅनडा कॉर्नरवरील वसंत मार्केटमध्ये असलेल्या ‘श्रमिक माथाडी व गार्ड बोर्ड संघटने’चा प्रतिनिधी असल्याचे सांगून सिटी सेंटर मॉलमधील टाईम झोन गेमसेंटरचे मॅनेजर प्रमोद पावसे, रिलायन्स सेन्ट्रीचे मॅनेजर किशोर गायकवाड, पीव्हीआर सिनेमाचे मॅनेजर विवेक शिवदास, एमआरडीआयवायचे मॅनेजर दादासाहेब गवळी, रिलायन्स ट्रेन्डचे मॅनेजर कुणाल दोदे, रिलायन्स डिजिटलचे मॅनेजर श्रीकांत सोनवणे व होम टाऊन शॉपचे सालेयन यांना ‘व्यवसायाचा माल खाली करुन देणार नाही, शॉप बंद करून टाकेल, स्टोअरचा माल खाली करण्यासाठी आलेल्या वाहनांखाली चिरडून टाकेल’, अशी धमकी देऊन दरमहा दहा हजार रुपयांप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पैसे घेऊन आत्तापर्यंत 1 लाख 80 हजार रुपयांची खंडणी उकळली व तसेच इतरांकडे पैशांची मागणी करुन श्रमिक माथाडी संघटनेची दिनांक विरहित पावती देऊन धमकी दिली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.