नाशिकमध्ये गुन्हेगारी सुरूच; दिवसाढवळ्या युवकावर हल्ला, दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर च


नाशिक गुन्हा: नाशिक शहरात पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीविरोधात विशेष मोहीम राबवली जात असतानाच, पंचवटीतील (Panchavati) गजानन चौक (Gajanan Chowk) परिसरातील कोमटी गल्लीत भरदिवसा थरारक हल्ला घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काल (दि. 13 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी एका युवकाचा पाठलाग करत त्याच्यावर धारदार शस्त्राने पोटावर वार केले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक पळत-पळत गजानन चौकातील कोमटी गल्लीत आला. काही क्षणांतच दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्याचा पाठलाग केला. या दरम्यान दुचाकीवरील दोघांनी दोन मुलींना आणि शाळेच्या व्हॅनला धडक दिली, आणि त्या युवकाला रस्त्यातच गाठले.

नाशिक गुन्हे: नागरिकांनी हल्लेखोरांना हस्तक्षेप केला

यानंतर दुचाकीवरून उतरलेल्या एकाने धारदार शस्त्राने युवकाच्या पोटावर हल्ला केला. मात्र, परिसरातील काही नागरिकांनी आरडाओरडा करत हस्तक्षेप केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. सुदैवाने, युवकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nashik Crime: पोलिसांकडून तपास सुरू

हा संपूर्ण प्रकार कोमटी गल्लीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, काही नागरिकांनीदेखील मोबाईलमध्ये थराराचे व्हिडीओ चित्रण केले आहे. पोलिसांनी हे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोघेही हल्लेखोर फरार झाले आहेत.

Nashik Crime: आरोपींना अटक करण्याची मागणी

नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय विशेष मोहीम राबवत आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक गुन्हेगारांवर कारवाई सुरू असतानाच घडलेली ही घटना पोलीस यंत्रणेसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Nashik Crime: दारू पिण्यास पैसे न दिल्याने चॉपरने मारहाण; गुन्हा दाखल

दरम्यान, दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने म्हसरूळ येथील धनगरबाबा मंदीरा जवळ बसलेल्या एका युवकाला चॉपर आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 11) सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अजय नामदेव शिंदे हा नाईकवाडी, शिंदे मळा, वरवंडी रोड, म्हसरूळ येथे धनगरबाबा मंदिराचे बाजूला बाकड्यावर बसलेले असताना यश चव्हाण, अश्विन जाधव व त्यांचे तीन ते चार साथीदार रिक्षामध्ये व मोटारसायकलवर सार्थक शिंदे याच्याकडे आले आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करू लागले. त्यावर त्याने त्यांना माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन यश चव्हाण याने शिवीगाळ करून तुझी विकेटच टाकतो असे बोलून त्याचाजवळील चॉपरने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारून दुखापत केली. याबाबत सार्थक अजय शिंदे (वय 18 रा. नाईकवाडी, शिंदे मळा, वरवंडी रोड, म्हसरूळ) याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गावित करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik Crime BJP: नाशिक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कमालीची सावध; घेतला मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.