मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात…; नाशिकच्या अपघातातील क
नाशिक अपघात : नाशिकच्या उड्डाणपुलावर परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडण्याच्या काही वेळा आधीच चारुदत्त दिनेश पवार या तरुणाने त्याच्या आईसोबत फोनवर संभाषण केले होते. मुलाचे आईसोबत फोनवर बोलून झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच हा अपघात झालाय.
याबाबत मयत चारुदत्त दिनेश पवार याच्या काकू सोनाली नरेंद्र पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की, काल निफाड येथे कार्यक्रमासाठी हे मुलं गेले होते. पिकअप ट्रकमध्ये सतरा-अठरा मुलं होती. आमच्या गल्लीतलेच हे सर्व मुलं होते. सगळे सोळा-सतरा वर्षाचेच मुलं आहेत. सगळ्यांचे आई-वडील खूप गरीब आहेत. या अपघातात माझ्या पुतण्याचा मृत्यू झाला. त्याची आई धुणेभांडे करून आपला उदरनिर्वाह करते. आम्हाला काय झालं काहीच कळालं नाही. फक्त अपघात झाला इतकीच आम्हाला माहिती मिळाली. सायंकाळी सहा वाजेला माझ्या पुतण्याचा त्याच्या आईला फोन आला. मुलगा म्हणाला मम्मी आम्ही जवळ आलो आहे. पंधरा ते वीस मिनिटात आम्ही घरी पोहोचतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर आम्हाला समजलं की अपघात झालाय, असे त्यांनी म्हटले.
अपघातापूर्वीचे स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल
दरम्यान, नाशिकमधील अपघातात मृत्यू झालेली मुले सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होती. हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षितपणे सह्याद्रीनगर येथे पोहोचला. मात्र, पुरुषांच्या ट्रकचा उड्डाणपुलावर द्वारका येथे भीषण अपघात झाला. या अपघाताच्या काहीवेळापूर्वी टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते. मात्र, पुढील काही क्षणांत त्यांच्यावर काळाने घाला घटल्याने नाशिकवर शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.