नाशिकमध्ये भाजप आमदार सीमा हिरेंची लेक अन् दीर निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल

नाशिक निवडणूक 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Election 2026) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. भाजप आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांची मुलगी आणि दीर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

भाजप आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे आणि दीर माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी सीमा हिरे म्हणाल्या की, नाशिकमध्ये युती संदर्भात अद्याप निर्णय नाही, मात्र आम्ही सर्व उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ कमी असल्यामुळे उमेदवारांची धावपळ होऊ नये, म्हणून अर्ज दाखल केले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Seema Hiray: शिवसेनेवर अन्याय होऊ देणार नाही

सीमा हिरे पुढे म्हणाल्या की, मुलगी रश्मी हिरे यांनी प्रभाग आठमधून अर्ज दाखल केला आहे. पक्षाकडून ज्यांना संधी दिली जाईल, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू. नाराजी नाट्य मागे पडले आहे, कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. युतीसाठी मंत्री गिरीश महाजन वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत आहेत. शिवसेनेवर अन्याय होऊ देणार नाही, पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांचा असेल,” असे देखील त्यांनी सांगितले.

Rahul Dive: काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले उमेदवार मैदानात

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले राहुल दिवे आणि आशा तडवी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना त्यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये निवडणुकीची रंगत वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Devyani Pharande: आमदार देवयानी फरांदेंचा मुलगाही निवडणुकीच्या रिंगणात

भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे या सहकुटुंब पश्चिम विभागीय कार्यालयात दाखल झाल्या. विशेष म्हणजे, भाजपमधील प्रवेश आणि नाराजीनाट्यानंतरही फरांदे कुटुंबाने थेट अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Election 2026: गिरीश महाजनांकडून रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा आढावा, नाशिकमधील हमखास निवडून येणाऱ्या जागांवर विशेष मंथन, आज युतीची घोषणा करणार?

आणखी वाचा

Comments are closed.