जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या ‘बॉस’ प्रकाश लोंढेला मोठा धक्का, भाजपने चारली पराभवाची धुळ; सुनेचाही

नाशिक निवडणूक निकाल 2026 : नाशिक महानगरपालिकेचा निकाल शुक्रवारी (दि. 16 जानेवारी) जाहीर झाला असून, प्रभाग क्रमांक 11 मधील निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेला आणि सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) न्यायालयीन कोठडीत असलेला माजी नगरसेवक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) उर्फ ‘बॉस’ याचा या निवडणुकीत पराभव झाला असून, भाजपचे उमेदवार नितीन निगळ विजयी झाले आहेत.

गोळीबार, खंडणीसह विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये तसेच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाल्यामुळे प्रकाश लोंढे सध्या कारागृहात आहे. अशा पार्श्वभूमीवरही त्याने महापालिका निवडणूक लढविल्याने ही लढत राजकीय आणि कायदेशीर दृष्टिकोनातूनही विशेष चर्चेत राहिली.

Nashik Election Results 2026 : दोन तासांचा सातपूर दौरा, कडेकोट बंदोबस्त

सुमारे तीन महिन्यांनंतर प्रकाश लोंढे सातपूर येथील आपल्या परिसरात अवघ्या दोन तासांसाठी परतला होता. काकू भिकूबाई लोंढे यांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी न्यायालयीन परवानगी घेऊन मंगळवारी रात्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला सातपूरमध्ये आणण्यात आले होते. लोंढे सातपूरमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या वाहनाभोवती समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंत्यसंस्कारानंतर काही वेळ तो समर्थकांमध्ये दिसल्याने परिसरात सतर्कता वाढवण्यात आली होती.

Nashik Election Results 2026 : ‘कायद्याचा बालेकिल्ला’ मोहिमेतील प्रमुख कारवाई

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘कायद्याचा बालेकिल्ला’ या विशेष मोहिमेत प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीवर प्रमुख कारवाई करण्यात आली होती. 5 ऑक्टोबर 2025 रोजी आयटीआय सिग्नल परिसरातील बारबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गुन्ह्यांत लोंढे, त्याची दोन्ही मुले आणि टोळीतील सदस्य सध्या कारागृहात आहेत.

Nashik Election Results 2026 : न्यायालयीन परवानगीने उमेदवारी

न्यायालयीन परवानगीने प्रकाश लोंढेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काकूंच्या निधनामुळे त्याला अंत्यसंस्कारासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास तो पोलिसांच्या सुरक्षाकवचात सातपूर अमरधाम येथे पोहोचला होता. या संपूर्ण घटनेमुळे प्रभाग क्रमांक 11 मधील निवडणूक निकालाबरोबरच प्रकाश लोंढेची भूमिका, त्याचा राजकीय प्रभाव आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या सहभागावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाशिकच्या राजकारणात हा विषय आगामी काळातही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Nashik Election Results 2026 : सुनेचाही पराभव

दरम्यान, एकीकडे प्रकाश लोंढेचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये भाजपकडून सविता काळे, आरपीआयकडून प्रकाश लोंढेच्या सून दीक्षा लोंढे, शिवसेना ठाकरे गटाकडून माया काळे यांच्या लढत झाली. या लढतीत भाजपच्या सविता काळे यांचा विजय झाला. तर प्रकाश लोंढेच्या सून दीक्षा लोंढे यांचा पराभव झाला.

आणखी वाचा

Nashik Election Result 2026: नाशिकमध्ये भाजपाच ‘धुरंधर’, महापालिकेत एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

आणखी वाचा

Comments are closed.