भोंदूबाबा अशोक खरातने 500 महिलांचं लैंगिक शोषण केले; गुलाबी गँगच्या अध्यक्ष संगीता तिवारी यांचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर गुलाबी गँगच्या अध्यक्ष संगीता तिवारी यांनी 500 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या दाव्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असून, जप्त केलेल्या पेनड्राइव्ह आणि लॅपटॉपमुळे आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

नाशिकचा भोंदूबाबा, ज्योतिषी अशोक खरात याच्या सेक्स स्कँडलने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरून गेला आहे. त्याच्या दरबारात बडे राजकारणी, सेलिब्रिटी आणि इतर मोठी माणसंही येऊन गेल्याचं सांगितलं जातं. या बाबाकडे एक पेनड्राईव्ह सापडला असून त्यात 100 व्हिडिओ अश्लील व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्याने चार पाच नव्हे तर तब्बल 500 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावाही केला जात आहे. गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी हा दावा केला असून उच्चभ्रू महिलाही त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने सुमारे 500 महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, असा दावा करून संगिता तिवारी यांनी खळबळ उडवून दिली आहे. यात उच्चभ्रू महिलाही असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, या बळी पडलेल्या महिला कोण आहेत? याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. मात्र, या नव्या दाव्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या. तसेच त्यांना या प्रकरणात सहआरोपी करा. त्यांना हे प्रकरण माहित होते. त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना जोडे मारू, असा इशारा संगिता तिवारी यांनी दिला आहे.

या प्रकरणाचा एसआयटी तपास करत आहेत. एसआयटीने भोंदूबाबाच्या घरातून लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह जप्त केले आहेत. हे साहित्य फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. त्यात आणखी काय काय निघतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या प्रकरणाने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.