ठाकरेंच्या शिवसेनेवर दुःखाचा डोंगर कोसळला, नाशिकमधील उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नाशिक वार्ता: मनमाड शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या (Manmad Nagar Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असतानाच एक दुःखद घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार नितीन वाघमारे (Nitin Waghmare) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मनमाड परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नितीन वाघमारे हे प्रभागातील ओळखले जाणारे आणि सक्रिय कार्यकर्ते होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा अचानक झालेला मृत्यू पक्षासाठी मोठी पोकळी निर्माण करणारा ठरला आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधून त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा उत्साह, पक्षाचा प्रचार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे ठाकरे गटात दुःखाची छाया पसरली आहे. अनेक स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व नेत्यांनी वाघमारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक कार्यक्रमावर काही अंशी परिणाम होणार आहे.
Manmad Nagar Parishad Election: मनमाडला बहुरंगी लढत
दरम्यान, मनमाडमध्ये थेट नगराध्यक्षसह 33 नगरसेवक पदासाठी निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 9 तर नगरसेवकांच्या 33 जागांसाठी तब्बल 215 उमेदवार रिंगणात आहे. नगराध्यक्षासह नगरसेवकांसाठी सर्व 16 प्रभागात बहरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. बदलती राजकीय परिस्थिती आणि तब्बल 9 वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे तरुण वर्ग या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे निवडणूक अतिशय चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून गल्ली बोळात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. काही ठिकाणी मात्र माजी नगरसेवकांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीने, सोबत उद्धब बाळसाहेब ठाकरे आणि अजित पवार राष्ट्रवादी स्वचळावर उतरले आहे. काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार दिले असून शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, यांच्यासह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहे. बहुरंगी लढतीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना, भाजप युतीचे बोगेश पाटील, उद्धब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवीण नाईक, अजित पवार गटाचे रविंद्र घोडेस्वार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शुभम चुनियान, बंचित बहुजन आघाडीचे नितीन जाधव, बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे, अपक्ष राजू निरभवणे, अपक्ष निमदेव हिरे, यांच्यासह दोन अपक्ष निवडणूक लढवित आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.