अवघ्या 24 तासांत भाजपचा ‘यू-टर्न’, नाशिकमध्ये फरांदे ताईंसोबत ‘पहिलवान’ ढिकलेंवरही निवडणुकीची ज
नाशिक वार्ता: नाशिक महापालिका निवडणूकप्रमुख पदावरून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांना हटवण्यात आले होते. त्यांच्या जागेवर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नियुक्तिपत्रही आ. फरांदे यांना मिळाले आहे. यामुळे आ. ढिकले समर्थक नाराज झाले. सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यानंतर 24 तासांतच भाजपाने यू-टर्न घेत निवडणुकीसाठी संघटनात्मक व्यवस्थेचा भाग म्हणून राहुल ढिकलेंबरोबरच आ. देवयानी फरांदे यांच्यावरही जबाबदारी सोपविल्याचे जाहीर करण्यात आले. अवघ्या 24 तासांतच भाजपाने असा यू टर्न घेतल्याने यातून भाजपत सारे काही अलबेल नाही, हे समोर आले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिल्यानंतर निवडणूकप्रमुख पदावर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांची नियुक्ती केली होती. भाजपाने चार दिवस मुलाखतींचा कार्यक्रम राबविला. 122 जागांसाठी 1,200 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखती झाल्यानंतर मात्र भाजपने अचानक निवडणूकप्रमुख पदावर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्षांचे पत्र पाठविले. त्यामुळे ढिकले समर्थक चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
Nashik Politics: राहुल ढिकलेंचं वक्तव्य चर्चेत
काही दिवसांपूर्वी राहुल ढिकले यांनी एका जाहीर कार्यक्रमात पक्षातीलच अंतर्गत विरोधकांवर तोफ डागली होती. आजारी असतानाही माझ्या विरोधात ज्यांनी काम केले, माझी रॅली अडवली, त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही. मी निवडणूकप्रमुख आहे. 122 ठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायची, हे मी ठरवेन. सर्वत्र हस्तक्षेप करणार नाही, पण ज्यांनी मला त्रास दिला त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे राहुल ढिकले यांनी म्हटले होते. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
Nashik Politics: भाजपला यू-टर्न घेण्याची वेळ का आली?
यातून आ. ढिकले यांना आलेला अहंकार पाहता पक्षातील अंतर्गत विरोधकांना एकप्रकारे आयते कोलितच मिळाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर आ. फरांदे यांची नियुक्ती केल्याचे समोर आले. मात्र, काल पुन्हा भाजपाच्या शहराध्यक्षांनी खुलासा करताना यासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे खंडन केले. निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून दोघांवरही जबाबदारी दिसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे 24 तासांतच भाजपला अचानक यू-टर्न घेण्याची वेळ का आली? जर दोघांवरही जबाबदारी दिलेली होती, तर आमदार फरांदे यांच्या नियुक्तीपत्रात तसा उल्लेख का नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
Nashik Politics: एक गट नाराज झाल्याने निर्णय फिरवला?
दरम्यान, आ. राहुल ढिकले यांच्याऐवजी आ.देवयानी फरांदे यांची निवडणूकप्रमुख म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे भाजपातील एक गट नाराज झाला असावा, त्यातून महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये, ढिकले यांचे कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून भाजपाने हा तोडगा काढला असल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.