नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, ‘तो’ व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठ
नाशिकरोड कारागृह : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कारागृहातील काही कैद्यांनी सुरक्षेचा फज्जा उडवत अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे या व्हिडीओंमध्ये मातीच्या चिलीमचा वापर करत अमली पदार्थ ओढताना दिसणारे दृश्य, तसेच कैद्यांकडून मोबाईल फोनवर शूट केलेल्या रील्स व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik Road Jail: पोलिसांकडून 5 ते 6 कैद्यांवर गुन्हा दाखल
या प्रकाराची दखल घेत नाशिकरोड पोलिसांनी 5 ते 6 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात हे व्हिडीओ मागील वर्षीचे असल्याचे निष्पन्न झाले असून, तरीही इतक्या गंभीर प्रकारानंतरही कारागृह प्रशासनाकडून वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, हे विशेष लक्ष वेधणारे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारागृह प्रशासनाने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे व्हिडीओ जुने असून, काही आत्मसंतुष्ट लोकांनी ते मुद्दाम व्हायरल केले आहेत. कैद्यांच्या सुधारासाठी गेल्या काही वर्षांपासून सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत,” असा दावा करण्यात आला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये मोबाईलचा सर्रास वापर, आणि अमली पदार्थांचे खुले सेवन पाहून या दाव्यांवर शंका उपस्थित केली जात आहे.
Nashik Road Jail: सुरक्षेवर गंभीर प्रश्न, यापूर्वीही मोबाईल सापडल्याचे प्रकार
नाशिकरोड कारागृहात यापूर्वीही सुरक्षेतील त्रुटींचा पर्दाफाश झाला होता.
24 नोव्हेंबर 2016 – 7 मोबाईल सापडले
23 डिसेंबर 2016 – 8 मोबाईल जप्त
26 डिसेंबर – 3 कर्मचाऱ्यांवर निलंबन
27 डिसेंबर – तपासणीदरम्यान मोबाईल सापडल्याची नोंद
Nashik Road Jail: कारागृहात अंमली पदार्थ कसे पोहोचतात?
तपासात हे समोर आलं आहे की, काही कैदी सुट्टीवरून परतताना प्लास्टिकमध्ये लपवून तंबाखू किंवा अमली पदार्थ कारागृहात घेऊन येतात. मातीच्या चिलीम वापरून ते पदार्थ ओढले जातात.
Nashik Road Jail: शिपायावर हल्ला, आणखी एक धक्कादायक प्रकार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. बंदीवान बिलाल अली हुसेन शेख याने शिपाई भाईदास भोई यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.