नाशिकच्या कारागृहात नेमकं चाललंय काय? कैदी अंमली पदार्थ सेवन करतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल; प्
नाशिकरोड कारागृह : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी कारागृहाच्या आत अमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, याच व्हायरल व्हिडीओंमध्ये काही कैद्यांनी मोबाईलवर रील्स देखील बनवल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Nashik Road Jail: जुने व्हिडीओ की नव्याने घडलेली घटना?
सध्या हे फोटो आणि व्हिडीओ नेमके कोणत्या कालखंडातील आहेत, आणि खरोखरच नाशिकरोड कारागृहातीलच आहेत का? याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने हे जुने व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. “गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत. हे पाहून काही आत्मसंतुष्ट व्यक्तींनी जुन्या क्लिप्स मुद्दाम व्हायरल केल्या आहेत,” असे कारागृह अधीक्षकांनी म्हटले आहे.
Nashik Road Jail: यापूर्वीही सुरक्षेचा भंग
नाशिकरोड कारागृहात यापूर्वीही मोबाईल वापराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
24 नोव्हेंबर 2016: 7 मोबाईल सापडले
23 डिसेंबर 2016: 8 मोबाईल जप्त
26 डिसेंबर: 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
27 डिसेंबर: तपासणीदरम्यान मोबाईल सापडल्याचे अधिकृत नोंद
या घटनांमुळे सुरक्षेच्या पातळीवर मोठी त्रुटी असल्याचे अधोरेखित झाले होते. त्यावेळी संशयित कैद्यांना इतर कारागृहात हलवण्यात आले होते.
Nashik Road Jail: कारागृहात अमली पदार्थ कसे पोहोचतात?
काही कैदी सुटीवरून परतताना तंबाखू, ड्रग्ज प्लास्टिकमध्ये लपवून आत घेऊन येतात. मातीच्या चिलीमचा वापर करून हे पदार्थ सेवन केले जातात. इतकेच नव्हे तर चार्जिंगसाठी मोबाईल कसा वापरला जातो, त्यामागे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? हेही तपासले जात आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नाशिकरोड कारागृह : कैद्याचा शिपायावर हल्ला
या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी संध्याकाळी कारागृहात आणखी एक धक्कादायक घटना घडली. बंदीवान बिलाल अली हुसेन शेख याने कारागृहातील शिपाई भाईदास भोई यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.