माझ्यासमोर बापाला आणले तर मीच त्याला फाशी देईन; नसरापूर घटनेतील आरोपीच्या मुलाचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्रात सर्व स्तरातून होत असताना त्याची पत्नी आणि मुलानेही त्याला कठोर शिक्षा करा, फाशी द्या किंवा ठेचून मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बापाला माझ्यासमोर आणले तर मीच त्याला फाशी देईन, अशी उद्विग्नता आरोपीच्या मुलाने बोलून दाखविली.

माध्यमांशी बोलताना आरोपीचा मुलगा म्हणाला, ‘मला त्याची वडील म्हणून ओळख सांगण्याची लाज वाटते. त्याला माझ्यासमोर आणले तर मीच त्याला फाशी देईन. त्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र, त्याच्या कृत्याची शिक्षा आम्हाला देऊ नका, आम्हाला आमचे भविष्य जगायचे आहे.’

Comments are closed.