National Crush बनताच गिरीजाचे फॉलोवर्स धडाधड वाढले, दोन दिवसातच कमावले लाखो चाहते

अलीकडे तुमची लोकप्रियता ही सोशल माध्यमांवर किती आहे यावरुन बऱ्याच गोष्टी ठरतात. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे गिरीजा ओक.. नॅशनल क्रश झालेल्या गिरीजाचे लाइफ क्षणार्धात बदलले आहे. तिचा फॅन फॉलोअर हा आता केवळ मराठीच माणूस राहिला नाही तर इतर भाषिकही गिरीजाचे फॉलोअर झाले आहेत. एका व्हिडीओमुळे आज तिला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की, गिरीजाही सध्या खूप खुश आहे.

सोशल मीडियावार अचानक एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रातोरात सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली. निळी साडी, मोकळे केस अन् मादक नजर असणारी अभिनेत्री गिरीजा ओकने त्या दिवशी इंटरनेटचं वातावरण तापवलं. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी सर्वांची अवस्था झाली होती. गिरीजाचा लल्लनटॉपच्या मुलाखती मधला एक शॉर्ट व्हिडीओ खूप व्हायरल झाला. यामध्ये तिने Transverse babes, longitudinal babes यावर तिने भाष्य केलं. या व्हिडीओत तिची बोलण्याची शैली आणि एलिगंट लूकवर चाहते खूप फिदा झाले. सोशल मीडियावर गिरीजा ट्रेंड करू लागली. तिचा हा सुंदर फोटो पाहून युजर्स ही महिला कोण हे सर्च करू लागल. विशेष म्हणजे अवघ्या तासात 3 लाख लोकांनी तिला सर्च केले.

गिरीजाच्या एका व्हिडीओमुळे तिला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. क्षणात इंटरनॅशनल क्रश बनणाऱ्या गिरीजाला चाहते इंडियाच्या मोनिका बेलूसीची उपमा मिळाली. गेल्या काही दिवसात गिरीजाने तब्बल 2 लाख 13 हजारांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आता तिचे 8 लाख 85 हजारांचा मोठा इन्स्टा परिवार आहे. तसेच गिरीजाचे अनेक फॅन पेजेसही तयार झाले आहेत. चाहत्यांच्या मिळाणाऱ्या प्रचंड प्रेमावर गिरीजाने प्रतिक्रिया दिली. हे ट्रेंड वगरे येत राहतात आणि जातातही, मात्र माझं काम हे कायम राहणार आहे, असे ती म्हणाली.

माझ्या मुलाने ते फोटो पाहिले तर… गिरीजा ओक स्पष्टच बोलली

Comments are closed.