Photo – नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा साडी ग्लॅमरस अंदाज!

आपल्या दिलखेचक हास्य आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ही दाक्षिणात्य सुंदरी केवळ अभिनयातच नाही, तर फॅशनमध्येही आघाडीवर आहे. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात रश्मिकाने परिधान केलेल्या पांढऱ्या भरजरी साडीतील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. ‘बिहाइंडवूड्स गोल्ड हॉल ऑफ फेम’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावल्यानंतर रश्मिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या खास सोहळ्यातील तिचे ग्लॅमरस फोटो तिने शेअर केले आहेत. शिवाय तिचे सुंदर फोटो शेअर करत, रश्मिकाने एका भावनिक नोटमधून आपल्या भावना व्यक्त केल्या: “भूमासाठी मला जे प्रेम मिळालं आहे ते खूप खास आहे.. ते शब्दांत मांडता येत नाही.. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे, विशेषतः @rahulr_23.. धन्यवाद!! मी नेहमीच तुमची आभारी राहीन! आणि मी तुम्हाला वचन देते की ही तर फक्त सुरुवात आहे.” असे म्हटले आहे.


Comments are closed.