देश – विदेश : शेख हसीना यांच्या खटल्यावर ब्रिटिश लॉ फर्मचे प्रश्नचिन्ह

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या खटल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ब्रिटिश लॉ फर्म किंग्सले नेपलेने या प्रकरणात हस्तक्षेप करत ट्रायलच्या निष्पक्ष आणि वैधतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लंडन येथील या लॉ फर्मने बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्यूनलला नोटिस पाठवून हसीना यांच्याविरुद्धची सुनावणी अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी दोन आठवडय़ांत उत्तर द्या, असे या फर्मने म्हटले आहे. हसीना यांच्या अनुपस्थितीत खटला सुरू करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.

सिम बायडिंग नियमाला ३१ डिसेंबरपर्यंत मुतादवड

व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि सिग्नल यासारख्या मोबाइल मेसेजिंग अॅपवर लागू होणारा सिम-बायडिंग नियम 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधी हा नियम लवकर लागू केला जाणार होता, परंतु कंपन्यांच्या मागणीनंतर सरकारने याला मुदतवाढ दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम युजर्सला दिलासा मिळाला आहे. सिम बायडिंगचा अर्थ मेसेजिंग अॅप त्याचवेळी चालेल ज्या वेळी फोनमध्ये एक ऑक्टिव सिम कार्ड चालू असेल, अन्यथा मेसेजिंग अॅप काम करणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने व्हॉट्सअॅप व टेलिग्राम युजर्सना दिलासा मिळाला आहे.

आयसीआयसीआय बँकेला नागपुरात 23 कोटींचा गंडा

नागपूरमधील आयसीआयसीआय बँकेच्या नऊ शाखेमध्ये बनावट सोने जमा करून 23 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. जानेवारी 2023 ते 2025 यादरम्यान हे सोने बँकेकडे ठेवण्यात आले. एकूण 195 लोकांनी हे बनावट सोने बँकेत जमा केले असून याची एकूण किंमत 23 कोटी रुपये आहे. बँकेने गोल्ड लोन पोर्टपहलियोचे इंटरनल ऑडिट केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानअफगाणिस्तानमध्ये चीनच्या मध्यस्थीने पुन्हा चर्चा सुरू

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांनी पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. या दोन देशामधील कटुता कमी व्हावी यासाठी चीन मध्यस्थी करत आहे. दोन्ही देशांतील संघर्ष कमी करण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्याभरापासून या दोन देशांत संघर्ष सुरू आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान या दोन देशांतील प्रतिनिधी चीनच्या उरूमकी शहरात बैठक करत आहेत. चीनकडून अद्याप यावर अधिकृत कोणतीही टिप्पणी करण्यात आली नाही. तालिबान सत्तेत आल्यापासून पाकिस्तानात हल्ल्यांची संख्या वाढली आहे. दोन्ही देशांतील तणाव विकोपाला गेला आहे.

जर्मनीहून जाणाऱ्या हिंदुस्थानींसाठी आता व्हिसा ट्रान्झिट सुविधा मोफत

जर्मनीने हिंदुस्थानी पासपोर्टधारकांसाठी आपल्या एअरपोर्ट ते व्हिसा ट्रान्झिट सुविधा फ्री करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या घोषणेमुळे आता हिंदुस्थानी व्यक्तींना जर्मन एअरपोर्टमधून जाताना वेगळा ट्रान्झिट व्हिसा घेण्याची आवश्यकता लागणार नाही. जर्मनीच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानींचा आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोपा होईल. या एका निर्णयामुळे केवळ प्रवास सोपा होणार नाही तर हिंदुस्थान आणि जर्मनी या दोन देशांतील संबंध आणि पर्यटनाला नवीन मजबुती मिळेल. या निर्णयासोबत हिंदुस्थान आणि जर्मनी यांच्या संरक्षण, व्यापार, आवश्यक मिनरल्स आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात सहकार्य वाढेल.

Comments are closed.