देश विदेश- एलपीजी सिलिंडर ई-केवायसीला मुदतवाढ
सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ई-केवायसी करता येईल. यापूर्वी आधार पडताळणीची अंतिम तारीख 16 ऑगस्ट होती, जी वाढवून 23 ऑगस्ट करण्यात आली होती.
रक्षाबंधनापूर्वी सोने-चांदीचे दर घसरले
रक्षाबंधनाच्या आधी म्हणजेच गुरुवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 2 हजार 860 रुपयांनी स्वस्त होऊन 1 लाख 58 हजार रुपये तोळा झाला आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 2 हजार 791 रुपयांची घसरण होऊन चांदी प्रति किलो 2 लाख 40 हजार रुपये झाली आहे.
दिल्लीत मॉडेलची घरात घुसून हत्या
दिल्लीत राहणाऱ्या 21 वर्षीय मॉडेलची घरात घुसून हत्या करण्यात आली. मुस्कान असे तरुणीचे नाव आहे. या हत्येचा आरोप जिम ट्रेनर इम्रानवर करण्यात आला आहे. मुस्कानचे कुटुंबीय बाहेर गेले होते आणि ती घरात एकटी होती. तेव्हा आरोपी तिथे पोहोचला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला.
अलास्कामध्ये विमान अपघातात 4 ठार
अमेरिकेतील अलास्कामध्ये एक छोटे विमान व्रॅश होऊन ते समुद्रात पडले. या अपघातात विमानातील चार प्रवासी मृत्युमुखी पडले. अलास्काच्या एका गावाजवळ ही घटना घडली. पायपर पीए-24 विमानाने अलास्कामधील शहर एंकोरेजहून उड्डाण केले होते. ते सेल्डोवियाच्या विमानतळाकडे जात होते.
Comments are closed.