देश विदेश- रशियात अज्ञात विषाणूमुळे मृत्यू
रशियामध्ये एका अज्ञात विषाणूमुळे प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 197 जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. प्लेग संशोधन प्रयोगशाळेत विषाणूचा नमुना असलेली टेस्ट टय़ूब फुटली होती. ही महिला अँटी-प्लेग संशोधन संस्थेत काम करत होती.
अमेरिकेत हेरगिरी महिलेला अटक
अमेरिकेच्या तपास यंत्रणा एफबीआयने लॉस एंजेलिस विमानतळावरून वॅनयिंग झांग ऊर्फ हीदर झांग महिलेला अटक केली. या महिलेवर चीन सरकारसाठी काम करत तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांच्या मुलावर पाळत ठेवून त्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ चीनला पाठवल्याचा आरोप आहे.
गांधीजींवर आक्षेपार्ह रील महिलेला भोवली
इन्फ्लुएन्सरला महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या 500 रुपयांच्या नोटेवर आक्षेपार्ह रील पोस्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सुरत पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेने सोमवारी ही कारवाई केली. सिमरन पटेल असे तिचे नाव आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 10 लाख फॉलोअर्स आहेत.
शेअर बाजारात घसरणीला ब्रेक
लागोपाठ चार दिवसांत झालेल्या घसरणीला अखेर सोमवारी ब्रेक लागला. बीएसई सेन्सेक्स 472 अंकांनी वाढून 72,382 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 133 अंकांनी वाढून 22,555 अंकांवर स्थिरावला. निफ्टी इंडेक्समध्ये आयटीसी, बीएसई, टाटा मोटर्स पॅसेंजर, श्रीराम फायनान्स शेअर्समध्ये वाढ झाली.
Comments are closed.