टॅरिफच्या दबावाचा हिंदुस्थानवर परिणाम होणार नाही; NATO च्या सल्लागारांनी ट्रम्प यांच्या गर्वाचे बुडबुडे फोडले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर जगभरातून टीका होत आहे. अमेरिकतही ट्रम्प यांना टीका सहन करावी लागत आहे. तेथील आर्थिक तज्ञ, धोरणकर्ते या धोरणावर टीका करत आहेत. त्यातच आता नाटो सल्लागार एफ. क्रिस्टल कौर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे बुडबुडे फोडत ट्रम्प यांच्या टॅरिफ शस्त्राचा किंवा टॅरिफचा दबावाचा हिंदुस्थानवर परिणाम होणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. ही ट्रम्प यांची पॉवर प्ले स्टाईल आहे, मात्र, त्याचा हिंदुस्थानावर फारसा प्रभाव दिसणार नाही.
नाटो सल्लागार एफ. क्रिस्टल कौर म्हणाल्या की, ट्रम्प हे हिंदुस्थान आणि जपानसह इतर अनेक देशांवर व्यापार करारासाठी टॅरिफद्वारे दबाव टाकत आहेत. ते दबावासाठी वापरत असलेली पद्धत हिंदुस्थानवर फारशी प्रभावी ठरणार नाही. भारतीय वस्तूंवर 50% कर लादण्याच्या निर्णयावर टीका करताना एफ क्रिस्टल कौर म्हणाल्या की, या निर्णयाचा दोन्ही देशांमधील व्यापारावरच नव्हे तर व्यापक अमेरिका-भारत संबंधांवरही नकारात्मक परिणाम होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर जगभरातून नाराजी व्यक्त होत आहे. हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादणे केवळ दोन्ही देशांमधील व्यापारासाठीच नाही तर एकूण संबंधांसाठी देखील हानिकारक आहे. दोन्ही देशात जिव्हाळ्याचे संबंध तयार होण्यास बराच वेळ लागला आहे. यामुळे हिंदुस्थानात अमेरिकेबाबत अविश्वास निर्माण होत आहे, असा इशाराही त्यांनी दिला. अणुकरार झाल्यापासून हिंदुस्थान-अमेरिका संबंध खूपच नाजूक आहेत. माजी राष्ट्रपती क्लिंटन आणि ओबामा यांनी हे संबंध मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम केले. आता सध्याच्या घडामोडींमुळे खूप अविश्वास निर्माण होत आहे. ही ट्रम्प यांची पॉवरप्लेची खेळी आहे. हिंदुस्थानला व्यापार कराराच्या मुद्द्यावर सहमत होण्यास भाग पाडणे आणि जपानसह इतर देशांवर दबाव आणणे, हे ट्रम्प यांचे ध्य आहे. मात्र, ते फारसे प्रभावी ठरणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Comments are closed.