अमेरिकेच्या दबावानंतर नाटोने संरक्षणावरील खर्च वाढवला

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष पेटला असताना आता अमेरिकेच्या दबावामुळे नाटोच्या सदस्य देशांनी आपल्या एकूण जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 5 टक्के संरक्षणावर खर्च करण्याला मंजूरी दिली आहे. स्पेनने मात्र, यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. तर रशियानेही संरक्षणावरील खर्च वाढवण्याला नकार दिला आहे. दरम्यान, 5 टक्के खर्च वाढवण्याची मर्यादा अमेरिकेसाठी नसून केवळ नाटोतील इतर सदस्य देशांसाठी असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाटोच्या शिखर परिषदेपूर्वीच अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. नाटोचे शिखर संम्मेलन बुधवारी होणार आहे.
Comments are closed.