नाट्य सेवा गौरव पुरस्कारांचे उद्या वितरण; मोहन जोशी यांचा विशेष सन्मान
गेली 91 वर्षे संगीत आणि साहित्याचा वारसा जपणारी संस्था ‘मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव’ यांच्यौपतर्फे डॉ. अ.ना. भालेराव यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा केला जातो. त्या अंतर्गत या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघ (नाट्य शाखा) आयोजित ‘नाट्यसेवा गौरव पुरस्कार वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून त्यांच्याच हस्ते नाटय़क्षेत्रातील विविध विभागांतील मानकऱ्यांचा ‘नाट्यसेवा गौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला जाईल.
पुरस्कार सोहळय़ानंतर रसिकांसाठी खास काही नाटय़पदे व नाटय़प्रवेश अशा स्वरुपाचा ‘स्मरणगाथा’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. चालू किंवा गेल्या वर्षी ज्या रंगभूमीवरील कलाकारांचे, लेखकांचे व संगीतकारांचे जन्मशताब्दी वर्ष होते, त्यांना अभिवादन करून त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींचे सादरीकरण या कार्यक्रमात केले जाईल. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी 5 वाजता मुंबई मराठी साहित्य संघ, डॉ. अ. ना. भालेराव सभागृह, गिरगाव येथे होणार आहे. कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. तरी या सोहळ्यास सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़ शाखेचे कार्यवाह ज्ञानेश पेंढारकर यांनी केले आहे.
Comments are closed.