IPL 2026: केकेआरला मिळाला हर्षित राणाचा बदली खेळाडू; 33 वर्षीय वेगवान गोलंदाजाची संघात एन्ट्री!

आयपीएल 2026 स्पर्धेची (Indian premiere league 2026) सुरुवात 28 मार्चपासून होत आहे. मात्र, त्यापूर्वीच वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ अडचणीत सापडला आहे. संघाचा महत्त्वाचा गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) दुखापतग्रस्त झाल्यामुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत केकेआरने (KKR) आता त्याचा बदली खेळाडू (Replacement) शोधला असून, 33 वर्षीय अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजाला संघात सामील करून घेतले आहे. हर्षित राणा दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने, त्याच्या जागी नवदीप सैनीची (Navdeep Saini) संघात वर्णी लागली आहे.

2025 च्या मुख्य लिलावात नवदीप सैनी ‘अनसोल्ड’ राहिला होता. तसेच, नुकत्याच झालेल्या मिनी लिलावातही कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. मात्र, आता केकेआरने त्याला संधी दिली आहे. तसेच सैनी शेवटचा 2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसला होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात आरसीबी (RCB) कडून केली होती. नवदीप सैनी टीम इंडियासाठी देखील खेळला असून तो त्याच्या अतिवेगवान चेंडूंसाठी ओळखला जातो.

2019 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने 11 विकेट्स घेतल्या होत्या, जो त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 32 सामने खेळले असून 23 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनमी रेट 8.83 राहिलेला आहे.

Comments are closed.