नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त हुकणार? सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याचा दावा सिडको आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी हाही मुहूर्त हुकणार असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. हा महिना संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरलेला असताना उद्घाटनाबाबत दोन्ही संस्थांकडून कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. हे उद्घाटन सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. आता ७ ऑक्टोबरचा मुहूर्त नक्की करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरपर्यंत होईल असा दावा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीचे सीईओ अरुण बन्सल यांनी काही मुलाखतींमध्ये केला आहे. मात्र हा दावाही आता फोल ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिना संपण्यास फक्त आठ दिवसांचा कालावधी उरलेला असला तरी उद्घाटनाची कोणतीही तयारी अद्याप सुरू झालेली नाही. विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबरऐवजी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. बहुतेक ७ ऑक्टोबरचा मुहूर्त नक्की करण्यात येणार आहे, असे शासकीय सूत्रांनी सांगितले आहे.

विमानाचे टेकऑफ नोव्हेंबरमध्ये
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हजारो कामगार रात्रंदिवस या साईटवर काम करीत आहेत. तरीही विमानतळ सुरू करण्याची पूर्ण तयारी अद्याप झालेली नाही. विमानतळाचे उद्घाटन झाले तरी विमानाचे लॅण्डिग आणि टेकऑफ येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या टेकऑफला सिडकोच्या एमडींनी एमएमआरडीएच्या कार्यक्रमात दुजोरा दिला असला तरी हे वेळापत्रकही पुढे जाण्याची शक्यता आहे.

Comments are closed.