नवी मुंबई विमानतळापर्यंत एनएमएमटी धावणार; पहिल्या टप्प्यात 20 बसेसची सेवा

खालापूर, खोपोली, कर्जतपासून ते थेट बोरिवलीपर्यंत लाखो प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेचा (एनएमएमटी) विस्तार आता थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाढणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन येत्या बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी झाल्यानंतर एनएमएमटीच्या २० बसेसचे परिचालन या नवीन मार्गावर सुरू होणार आहे. त्यामुळे विमानतळावर जाणारे प्रवासी आणि कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वेशीवरच असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचे काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनेही या परिसरातून एनएमएमटी बसेसचे परिचालन सुरू करण्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाने १५० नवीन सीएनजी गाड्या खरेदीची निविदा प्रसिद्ध केली आहे. विमानतळाचे उद्घाटन होताच पहिल्या टप्प्यात २० बसेस विमानतळ मार्गावर चालवल्या जाणार आहेत.
नवी मुंबई विमानतळापासून नवी मुंबई महापालिकेची हद्द काही मिनिटावर आहे. त्यामुळे विमानतळ सुरू होताच विमानतळाला रेल्वे स्थानकाशी जोडण्यासाठी पालिकेचा परिवहन विभाग तयारी करत आहे. एकीकडे विमानतळापासून लगतच असलेल्या रेल्वे मार्गाबरोबरच हार्बर रेल्वेपर्यंतच्या स्थानकापर्यंत सेवा सुरू करण्याबाबतची पूर्वतयारी करण्यात आली आहे, असे एनएमएमटीच्या सूत्रांनी सांगितले.
Comments are closed.