नवी मुंबई विमानतळावर तिसरी धावपट्टी; सिडकोने केली सल्लागाराची नियुक्ती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी तयार करण्यासाठी सिडकोने राईट्स लिमिटेड आणि क्रिएटीव्ह ग्रुप एलएलपी यांची आज सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या दोन्ही संस्था धावपट्टीच्या तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यतेचा अभ्यास सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणार आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यासाबाबत महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आज बैठक पार पडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना ही मुंबई महानगर प्रदेशाच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन जागतिक दर्जाचे विमानवाहतूक केंद्र म्हणून करण्यात आली आहे. आगामी दशकांत हवाई वाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित असल्याने भविष्योन्मुख नियोजन अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राईट्स – क्रिएटीव्ह ग्रुप यांची सल्लागार म्हणून नियुक्ती ही सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण आणि भविष्याभिमुख पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनाचे द्योतक आहे.
Comments are closed.