Navi Mumbai Crime – सीवूडमध्ये नराधम स्कूल बस चालकाचा 4 वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार

नवी मुंबईमध्ये शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच सीवूड येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. सीवूड येथील नामांकित शाळेतील नराधम बस चालकाने 4 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळेमध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळा प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे पालकांनी एकत्र येऊन यावर आवाज उठवला आहे.
Comments are closed.