Navi Mumbai Police action against Bangladeshis in APMC, Kharghar
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचे सत्र सुरुच आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बांगलादेशी नागरिकांना घर भाडयाने दिल्यास, कामासाठी ठेवल्यास संबधीत घरमालक, बांधकाम व्यवसायिक किंवा परदेशी नागरीकांना मदत करणार्या इतर व्यक्ती यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. परकीय नागरिक कायदा कलम १४ ( क ) तसेच रजिस्टे्रशन ऑफ फॉरेनर्स अॅक्ट १९३९ कलम ५ अन्वये मदत करणारा सहआरोपी ठरणार आहे, असे पोलिसांनी आदेशीत केले आहे. बांगलादेशींना कोणत्याही प्रकारची मदत करु नये, असे आवाहन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा आणि नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचे सत्र सुरुच आहे. पोलिसांनी खारघर आणि एपीएमसी परिसरात घुसखोरी करुन वास्तव्य करणार्या महिला व पुरुषांवर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…Shiv Sena : शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांची भेट; एकनाथ शिंदेंचा आहे असा निरोप
शहरात बेकायदेशीर वास्तव्यास असणार्या बांगलादेशींवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त, (गुन्हे)अमित काळे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक पुथ्वीराज घोरपडे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली आहे.
२१ डिसेंबर रोजी कोपरा गांव, सेक्टर १०, खारघर येथे छापा टाकून १ पुरूष, ३ महिला तर कोपरी गांव, सेक्टर २६, एपीएमसी येथून १ पुरूष लहान मुलासह ५ महिलांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व जण कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय मागील काही र्वाापासुन भारतात प्रवेश करून राहत होते. पुरुष बिगारी तर महिला घरकाम करीत होत्या, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्याच प्रमाणे व्हिजा संपुनही बेकायदेशीर वास्तव्य करणार्या खारघर, सेक्टर १८ येथे मोनिल खान याला ताब्यात घेत या सर्वांवर खारघर व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा…CM Fadnavis : आता एका वर्षात मिळणार 20 लाख घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
सदरच्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, कोलते, धोणसेकर, अडकमोल, भोये हे सहभागी झाले होते.
(Edited by :Dnyaneshwar Jadhav)
Comments are closed.