नवनाथ वाघमारेंची कार जाळणारा पोलिसांच्या ताब्यात, आरोपी जरांगे यांचा राईट हॅन्ड असल्याचा दावा


जालना : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची दोन दिवसापूर्वी जालना येथील घरासमोर असलेघेतले स्कार्पिओ जाळण्यात आली होती. याप्रकरणी आज (24 सप्टेंबर) पोलिसांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा सहकारी असलेला विश्वंभर तिरुखेला या प्रकरणांमध्ये अटक केलंय. कालपासून फरार असलेल्या विश्वंभर तिरुखे याला अंबड चौफुली येथे जालना (Jalna Police) पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणी तिरुखे याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे?

दरम्यान, या प्रकरणी नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावरती आरोप करत तिरुपे हे मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा आणि निकटवर्ती असून त्याचे कर्ते करविते मनोज जरांगेच असल्याचा दोष केला आहे? परिणामी मनोज जरांगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी केलीय. दरम्यान याप्रकरणी मनोज जरांगे यांना या बाबत प्रश्न केला असता यावेळी मनोज जरांगे यांनी आपण असले धंदे करत नाही, जे करायचं ते आपण समोरासमोर करतो असं म्हणत हे आरोप फेटाळून लावले आहे?

नेमकं काय घडलं?

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी सोमवारी (21 सप्टेंबर) एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला. गाडीवर टाकलेल्या कव्हरवर त्याने कॅनमधून आणलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली.

दरम्यान, या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण प्रकरणी नवनाथ वाघमारे यांनी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली.ही घटना घडताच वाघमारेंनी मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले होते. आपली गाडी ही जरांगेंच्या सहकाऱ्यानेच पेटवल्याचा दावा त्यांनी केला होता.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.