नवरात्र 2025 – श्री तुळजभवन देवीचा दुसरा मजला

श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या माळे दिवशी अभिषेक पुजेनंतर अलंकार पुजा मांडण्यात आली. पहाटे 6 वाजता घाट देवून अभिषेक पुजेस सुरूवात करण्यात आली. सकाळी 10 वाजता वस्त्र अलंकार चढवून पाळीचे पुजारी तुषार कदम यांच्याकडून धूप आरती काढण्यात आली.
श्री तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस शुक्रवार दि. 26 सप्टेंबर पासून सुरूवात होणार आहे. शुक्रवारी ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. दि 27 सप्टेंबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि 28 सप्टेंबर रोजी शेषशायी अलंकार महापूजा, दि 29 सप्टेंबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि 30 सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमीच्या दिवशी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा पार पडणार आहे.
सततच्या अतिवृष्टीमुळे शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांसह पुजारी आणि व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे अपेक्षित गर्दी जमली नसल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. देवी दर्शनासाठी येणाऱ्या देवी भक्तांना मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, यांच्याकडून अधिकाधिक सेवा सुविधा पुरविल्या जात आहे. भाविकांनी तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. मंदिर प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Comments are closed.