शारदीय नवरात्र महोत्सव 2025 – तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न
श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो”च्या जयघोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार साजरा करण्यात आला.
पहाटे श्री तुळजाभवानी देवीची १०८ साड्यांमध्ये गुंडाळून भिंगार (अहिल्यानगर) येथून आलेल्या मानाच्या पालखीतून मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करत मिरवणूक काढण्यात आली. प्रदक्षिणेच्या दरम्यान देवीची पालखी पिंपळाच्या पारावर टेकवून आरती करण्यात आली.
विजयादशमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवी आपले सिंहासन सोडून भाविकांसोबत सीमोल्लंघन करण्यासाठी मंदिराबाहेर येते, अशी परंपरा आहे. सीमोल्लंघन पूर्ण झाल्यानंतर देवी पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण परिसरात कुंकवाची मुक्त उधळण करण्यात आली. भाविकांच्या “आई राजा उदो-उदो” च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
मंदिरात, त्याच्या धार्मिक स्त्रोताचा हा धार्मिक स्रोत आमदार ताथ रणाजित सिंह पाटील, राज्यातील जिल्हा जिल्हा दंडाधिकारी, ठार, पोलिस सुपरवायझर रितू खोकर, पोलिस अधीक्षक पोलिस, अधिकेश, अनी-चॅम्पर डेसक्रिटिस सुपरव्हिस (प्रीनट्रन्सी) मेन मेन, महंट चिज्ञ हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपिया पूजेरी मंडल, विपिना, विपिना, अमराजे कडमचे स्प्रेडर, पालिकर्या पूजन प्रसान, स्प्रेडर विकिन दांडे, स्प्रेड्स आणि विपिद प्रातिश उत्सव.
दरवर्षी शारदीय नवरात्रात होणाऱ्या या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. आजही पहाटेपासूनच हजारो भाविक मंदिर परिसरात जमले होते. कुंकवाची उधळण, देवीच्या जयघोषांनी तुळजापूर नगरी मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाली.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. #Dasara2025 #दसरा pic.twitter.com/skjlHz6sun
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 2 ऑक्टोबर, 2025
Comments are closed.