Navratri 2025 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक सरस्वती माता पोषाखासह अलंकार परिधान
नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस सरस्वती माता पोषाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा नक्षी टोप, कौस्तुभ मणी, हिऱ्याचे कंगन जोड , दंड पेट्या जोड, मस्य जोड,नाम निळाचा, मोत्याची कंठी १ पदरी, मोत्याची कंठी २ पदरी, मारवाडी पेत्याचा मोत्याचा हार, बाजीराव कंठी, तुळशीची माल १ पदरी, इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच रुक्मिणीला मोठी नथ, मण्यां मोत्याचे पटल्या जोड, रूळ जोड, सोन्या मोत्याचा, तानवड जोड, कर्णफुले जोड, बाजीराव गरसोळी, पेट्याची बिंदी, हातसर जोड, चिंचपेटी हिरवी, पानड्याचा हार जडावाचा हार तारामंडळ, मद्रासी कंठा, सोन्याचे बाजूबंद जोड, ठुशी, मोत्याचे मंगळसूत्र,मोत्याचे कंठा, तन्मणी मोठा, मोर जोड इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
राधिका मातेस जवेची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल,चिंचपेटी तांबडी, व सत्यभामादेवीला जवेची माळ, जवमनी पदक, नवरत्नाचा हार, चिंचपेटी पांढरी, पुतळ्यांची माळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आला आहे.
सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मानिय सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवातील सर्व प्रथा व परंपरांचे सविस्तर माहिती विविध समाज-माध्यमांतून प्रसिध्द होत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
Comments are closed.