दक्षिण पुण्यात रंगणार नाम, ज्ञान आणि प्रेमदानाचा नवरात्र सोहळा; आदिशक्ती माता सिच्चयाई देवीचा धार्मिक उत्सव

अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून यंदा दक्षिण पुण्यात आदिशक्ती माता सिच्चयाई देवींच्या नवरात्र पावन पर्वानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आगम जैन मंदिरासमोर, श्री दुगड जीवदया संस्थेजवळ, कात्रज येथे पार पडणार असून, “नाम, ज्ञान आणि प्रेमदानाचा” हा एक परिपूर्ण सोहळा ठरणार आहे.

दरवर्षी प्रमाणे प्रमोद दुगड मित्र परिवार यांच्यातर्फे हा सोहळा आयोजित केला आहे. हरिनाम सप्ताहात दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारी (23 सप्टेंबर) मंगल कलश यात्रा व व्रत बैठकीने होणार आहे. त्यादिवशी ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. बुधवारी (24 सप्टेंबर) विद्यावाचस्पती ह.भ.प. सचिन महाराज पवार “मनुष्यामरुपा”, “कर्दम देवहुत संवाद” व “ध्रुव चरित्र, अजामिल अख्यान” सादर करतील. गुरुवारी, (25 सप्टेंबर) समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर “गजेंद्र उद्धार, वामन चरित्र, श्रीराम चरित्र” घेऊन रसिकांना प्रबोधित करणार आहेत.

शुक्रवारी (26 सप्टेंबर) महंत श्री महादेव महाराज शांतीजी (जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम) यांच्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या कथा रंगणार आहेत. शनिवारी (27 सप्टेंबर) सकाळी 9 ते 11 “काल्याचे कीर्तन” ह.भ.प. गणेश महाराज भगत यांचे होणार आहे. संध्याकाळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील “बाललीला व गोवर्धन लीला” सादर करणार आहेत. समारोप मंगळवारी (30 सप्टेंबर) कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या “श्री कालिका अगस्त्यऋषि निकुंभ महायज्ञ” सायं. 5 ते 8 या वेळेत होणार आहे.

या संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवात कीर्तन, नामस्मरण आणि अध्यात्मिक प्रबोधनाचा अनोखा संगम होणार असून, परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजक गौरव दुगड यांनी केले आहे.

Comments are closed.