नेव्हीला स्वदेशी 3 डी एअर पाळत ठेवण्याचे रडार प्राप्त होते
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर : टीएएसएल अन् स्पेनच्या कंपनीची भागीदारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडने (टीएएसएल) स्पेनची डिफेन्स कंपनी इंद्रासोबत मिळून भारतीय नौदलासाठी पहिला 3डी एअर सर्व्हिलान्स रडार (3डी-एएसआर)-लांजा-एन कमिशन केले आहे. हा रडार एका भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर बसविण्यात आला आहे. हे भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
लांजा-एन इंद्राचा लांजा 3डी रडारचे नौदल वर्जन असून जे जगातील सर्वात अत्याधुनिक दीर्घ पल्ल्याची हवाई सुरक्षा आणि क्षेपणास्त्रविरोधी रडारपैकी एक आहे. हा रडार आकाश आणि जमीन दोन्हींच्या लक्ष्यांना 3डीमध्ये ट्रॅक करतो. याची रेंज 254 नॉटिकल्स माइल्स (जवळपास 470 किलोमीटर) आहे. हा रडार ड्रोन, सुपरसोनिक लढाऊ विमाने, एंटी-रेडिएशन क्षेपणास्त्रs आणि नौसैनिक प्लॅटफॉर्म्सना ट्रॅक करू शकतो.
हा रडार खराब हवामानातही काम करतो आणि शत्रूच्या हल्ल्यांना रोखण्यास सक्षम आहे. लांजा-एन रडार स्पेन व्यतिरिक्त अन्य देशामध्ये काम करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. इंद्राने याला भारतीय महासागरातील आर्द्रता आणि उष्णतेनुसार अनुकूलित केले आहे. रडारला युद्धनौकेच्या सर्व यंत्रणांशी जोडण्यात आले आहे. कठोर सागरी परीक्षणानंतरच नौदलात याचा समावेश करण्यात आला आहे. परीक्षणांमध्ये विविध नौसैनिक आणि हवाई प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यात आला.
टाटा अन् इंद्राचे सहकार्य
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि इंद्रादरम्यान 2020 मध्ये झालेल्या कराराचा परिणाम म्हणजे ही कामगिरी आहे. या करारात 23 रडार्सच्या पुरवठ्याची तरतूद आहे. यातील 3 रडार्स इंद्राकडून प्राप्त होतील. उर्वरित 20 रडार टाटा कंपनी भारतात असेंबल करणार आहे. टाटा कंपनीने कर्नाटकात एक रडार असेंबली, इंटीग्रेशन आणि टेस्टिंग सुविधा निर्माण केली आहे. इंद्रासोबत आमचे सहकार्य भारतात रडार निर्माण क्षमतेला मजबुत करण्याचे प्रतीक आहे, आम्ही स्थानिक पुरवठासाखळी आणि तांत्रिक प्राविण्यतेद्वारे अत्याधुनिक संरक्षणप्रणालींची इकोसिस्टीम तयार करत आहोत असे उद्गार टीएएसएलचे सीईओ सुकर्ण सिंह यांनी काढले आहेत. हा प्रकल्प रडार पुरवठ्यापेक्षा अधिक आहे, आम्ही बेंगळूरमध्ये टाटा कंपनीसोबत रडार फॅक्ट्री तयार केली असून ती आम्हाला स्थानिक उत्पादन आणि सेवा प्रदान करण्यास मदत करणार असल्याचे वक्तव्य इंद्राच्या नेव्हल बिझनेस प्रमुख आना बुएंडिया यांनी केले.
भारतीय नौदलासाठी महत्त्व
हा रडार भारतीय नौदलाच्या फ्रिगेट, डिस्ट्रॉयर आणि विमानवाहू युद्धनौकेवर बसविण्यात येणार आहे. प्रथम कमिशन्ड रडार एक युद्धनौकेवर बसविण्यात आला असून उर्वरित लवकरच प्राप्त होणार आहेत. हा रडार नौदलाच्या देखरेख प्रणालीला मजबुत करेल. खासकरून शत्रूचे ड्रोन, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या विरोधात. इंद्राचा लांजा-एन रडार मॉड्यूलर, सॉलिड टेस्ट आणि पल्स्ड टॅक्टिल रडार असून तो सर्वप्रकारच्या हवाई आणि जमिनीवरील लक्ष्यांना ट्रॅक करतो. नेक्स्ट जनरेशन नेव्हल सर्व्हिलान्स रडार निर्माण अन् इंटीग्रेट करणारी टीएएसएल ही पहिली भारतीय कंपनी आहे.
Comments are closed.