आंध्रमध्ये नौदलाच्या खलाशीने गर्लफ्रेंडची हत्या केली
गुहा यांची पोलिस ठाण्यात कबुली
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका विवाहित नौदल जवानाने रविवार, 29 मार्च रोजी आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केल्यानंतर तो पोलीस ठाण्यात पोहोचला. याप्रसंगी त्याने पोलिसांसमोर आपल्या गुह्याची कबुलीही दिली. मृत प्रेयसीची ओळख 31 वर्षीय मोनिका अशी पटली असून, आरोपीचे नाव 35 वर्षीय चिंतादा रवींद्र असे आहे.
आरोपी भारतीय नौदल जहाज ‘देगा’ येथे तैनात असलेला एक तंत्रज्ञ आहे. काही आठवड्यांपूर्वी त्याची पत्नी विजयनगरम येथील तिच्या माहेरी गेली होती. त्यानंतर, आरोपीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावून तिची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने तिचे डोके, हात आणि पाय धडापासून वेगळे केले. पायाखालील भाग एका ट्रॉली बॅगमध्ये लपवले आणि धड फ्रिजमध्ये ठेवले. तर डोके आणि हात एका निर्जन ठिकाणी नेत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घरात आणि फ्रिजमध्ये शरीराचे अवयव आढळले. मोनिकाचे डोके गायब होते. रवींद्रने तिचा मृतदेह दुसरीकडे फेकून दिला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रवींद्र आणि मोनिका यांची भेट 2021 मध्ये ‘मिंगल’ नावाच्या डेटिंग अॅपवर झाली होती. ते विशाखापट्टणममधील उद्याने आणि चित्रपटगृहे यांसारख्या विविध ठिकाणी वारंवार भेटत असत. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याचदरम्यान 2024 मध्ये रवींद्रने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याची माहिती उघड झाली आहे.
Comments are closed.