आठ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार झाला आहे.
वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दिलीप बेडजा या 8 लाख रुपयांचे इनाम असलेया नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. दिलीप बेडजासोबत एका महिलेसह अन्य दोघांनाही चकमकीत ठार करण्यात आले. दिलीप हा राष्ट्रीय उद्यान क्षेत्र समितीचा विभागीय समिती सदस्य (डीव्हीसीएम) होता. सुरक्षा दलांना चकमक झालेल्या घटनास्थळावर एक महिला आणि तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच एक एके-47 रायफल आणि एक .303 रायफल सापडली.
जिह्याच्या वायव्य भागातील जंगली आणि डोंगराळ भागात रविवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती, असे बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले. नक्षलवादी दिलीप बेडजासोबत सशस्त्र नक्षलवादी एका ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी, कोब्रा आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. दुपारपर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी एकाची ओळख दिलीप बेडजा अशी झाली. संध्याकाळी आणखी एक चकमक झाली, ज्यामध्ये एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.