नॅक्सलाइटचे डेप्युटी कमांडर सोधी कन्ना गोळी मारली

छत्तीसगडमधील बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात चकमक

वृत्तसंस्था/ बिजापूर

छत्तीसगडच्या बिजापूर जिह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 8 लाखांचे बक्षीस असलेला उपकमांडर आणि स्नायपर सोधी कन्ना याला कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीनंतर त्याच्या मृतदेहासह रायफल व इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तम नियोजनाने पार पाडण्यात आली. ही चकमक झाली तेव्हा सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचे पथक जंगलात गस्त घालत होते. संयुक्त सुरक्षा पथकाच्या हाती लागलेले हे मोठे यश मानले जात आहे.

विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी एक भयंकर चकमक झाली. यामध्ये पीएलजीए बटालियन क्रमांक-1 च्या कंपनी 2 चा डेप्युटी कमांडर सोधी कन्नाला ठार करण्यात आले. पोलीस या नक्षलवाद्याचा बराच काळ शोध घेत होते. त्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस होते. सोधी कन्ना हा कुख्यात नक्षलवादी हिडमाचा निकटवर्तीय मानला जात होता. त्याला बटालियनमध्ये स्नायपरची जबाबदारी देण्यात आली होती. स्नायपर म्हणजेच तो दुरून कोणतेही लक्ष्य अचूकपणे टिपण्यात तज्ञ होता.

Comments are closed.