इमोशनल ब्रेकडाऊन, हातावरचा टॅटू, रोहिणी खडसे अडचणीतून बाहेर कशा पडल्या?

रोहिणी खडसे: पुण्यातील रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे सध्या चर्चेत आल्या आहेत. पतीवर गंभीर आरोप असल्यामुळे रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे. कोकेन आणि गांजा यासारखे अंमली पदार्थ पुण्यातील रेव्ह पार्टीत प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) सापडल्याने एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रोहणी खडसे यांनी एका बेव पोर्टलला दिलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीमध्ये रोहिणी खडसे यांनी अडचणीच्या काळात आपण नेमकं काय करतो, यावर प्रकाश टाकला आहे.

प्रत्येक भारतीयाने भगवदगीता, रामायण आणि महाभारत हे तीन ग्रंथ वाचले पाहिजेत. या ग्रंथांमधून आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात मी अडखळते, जेव्हा मला हरल्यासारखं किंवा इमोशनली ब्रेकडाऊन होते तेव्हा मी भगवदगीत उचलते आणि वाचायला लागते. प्रत्येकवेळी मला आयुष्य जगण्यासाठी नवीन काहीतरी प्रेरणा मिळते, एवढं सगळं त्या ग्रंथांमध्ये लिहले आहे. महाभारत आणि रामायणातील कथा मला संघर्षपूर्ण काळात लढण्यासाठी प्रेरणा देतात. हे सगळं वाचून तुम्हाला जगण्याचा खरा  अर्थ कळतो. ‘माझ्यासोबतच अशा गोष्टी का होतात’, ‘मीच का’, ‘माझा पराभव का झाला’, या सगळ्याची  उत्तरं यामधून मिळतात, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. मी हातावर श्रीकृष्णाचा टॅटू काढून बरीच वर्षे झाली. मी श्रीकृष्णाची भक्त आहे. जेव्हा संकटं येतात तेव्हा कृष्ण माझ्याजवळ आहे, ही एक गोष्ट मला लढण्यासाठी पाठबळ देते. भगदवगीतेत सांगितलेल्या गोष्टी ऐकून मी पुन्हा नव्या जोमाने लढते. त्यामुळे मला प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होते, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले.

Maharashtra Politics: राजकारण्यांनी वाचत राहिलं पाहिजे: रोहिणी खडसे

रोहिणी खडसे यांनी या मुलाखतीत आपण दररोज काहीतरी वाचन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मी सध्या समर यांनी लिहलेलं ‘साधू’ हे पुस्तक वाचत आहे. शिवाजी महाराज आग्र्यावरुन कसे सुटले, याचे वर्णन पुस्तकात आहे. राजकारणी लोकांनी जे समोर येईल ते वाचायची तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे तुमचं ज्ञान वाढतं, तुम्ही प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरं देऊ शकता, या गोष्टी यावर अवलंबून असतात, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=K20NJQ3P0DE

आणखी वाचा

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचे आरोप; निखील खडसेंनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा काय घडलं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहाटे 3.20 वाजता छापा; रेव्ह पार्टी सुरू असलेल्या रूम नं. 102 मधून खडसेंच्या जावयाला अटक, वकिलांचा स्फोटक दावा, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी

आणखी वाचा

Comments are closed.