जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, ‘मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर…’

राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या (NCP Merger) चर्चेने जोर धरला होता. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार (Ajit Pawar) त्यासाठी आग्रही होते, असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे घोडे अद्याप अडले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. (Maharashtra Politics news)

बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वाहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावर आता अजितदादा गटाचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.

Shashikant Shinde NCP: शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे भाष्य केले होते. 12 फेब्रुवारीला आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणार होतो. विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

विलिनीकरणाची घाई कशाला? नवीन कॅप्टन नेमलेत ते बघतील; छगन भुजबळांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य; म्हणाले, सुनेत्रा पवारांना…

आणखी वाचा

Comments are closed.