पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शशिकांत शिंदे: राज्यसभेच्या 26 जागांसाठी (Rajya Sabha Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Politics) सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यसभेसाठी राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज सकाळी 11.30 वाजता राजेंद्र जैन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते.
अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर त्यांचं पक्षातील महत्व वाढल्याचं पाहायला मिळत आहे, असं शशिकांत शिंदेंनी सांगितले. छगन भुजबळ संघर्ष करणारे नेते आहेत. दिल्लीतून मंजूरी दिली नसेल तर माहिती नाही. शरद पवारांनी अनेक लोकांना उभे केले. त्यांनी अनेकांना न्याय दिला तो आता का मिळत नाही? याचा विचार त्यांनी करावा, असंही शशिकांत शिंदेंनी सांगितले.
सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी शरद पवारांची घेतली होती भेट- (Sunil Tatkare And Praful Patel Meet Sharad Pawar)
अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नसल्याने एकच गहजब झाला होता. तटकरे-पटेलांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त तेव्हा पसरले होते. यानंतर काही दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साईडलाईन करण्यात आल्याचेही सांगितले जात होते. याचदरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली होती. परंतु दोघांच्या भेटीच्या टायमिंगची चांगलीच चर्चा रंगली होती.
राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
- नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
- मतदानाची तारीख: १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४)
- मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.