बप्रमाची ताकद अशी आहे की, देशावर मोठे लोक माझ्या नावाचा गराडा घालत आहेत

देशावर संकट आले की मोठमोठे लोक मदतीसाठी शरद पवार यांचे नाव घेतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, ही बारामतीकरांची ताकद आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ‘बारामती हायड्रोलिक’ कंपनीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले, तरुणांनी चिकाटी सोडता कामा नये. कष्ट करायची ताकद ठेवली पाहिजे. कोणतेही संकट आले तरी चिंता करू नये. देशावर संकट आले की काही मोठे लोक शरद पवार यांचे नाव घेतात. त्यामुळे कोणतेही संकट आले तर त्याची सोडवणूक करण्यात येईल. मात्र, काम मात्र नीट करा, कष्टाने करा. लोकांनीसुद्धा काम द्यायचे म्हटले की ते बारामतीतील तरुणांना दिले पाहिजे असा संदेश देशात गेला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे शरद पवार यांनी अनेक वर्षांनंतर भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी रोजगाराबाबतच्या समस्या मांडल्या. स्थानिक युवकांना एमआयडीसीत अनेक कंपन्यांमध्ये स्थान दिले जात नाही. स्थानिक असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. त्यांना डावलले जाते, अशी तक्रार वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे यांनी केली. त्यावर या समस्या सोडवण्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.

Comments are closed.