राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काळी दिवाळी साजरी करणार, महायुतीच्या फसव्या पॅकेजचा निषेध

पूरग्रस्त शेतकऱ्यांना फसवे पॅकेज देणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीचे निवेदन आज अपर जिल्हाधिकारी यांना दिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जिल्हा सरचिटणीस रणजीत शिर्के, जिल्हाध्यक्ष युवक नौसीन काझी, शहराध्यक्ष निलेश भोसले जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संकेत कदम, माजी नगरसेवक बबन आंबेकर, जिल्हा युवक सरचिटणीस मतीन बावांनी, अल्पसंख्याक महिला शहराध्यक्ष फरजाना मस्तान, सनीप गव्हाणकर व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.