मोठी बातमी: शरद पवार गटातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द, जयंत पाटलांनी तडकाफडकी आदेश क

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. 16 एप्रिल रोजी पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली, याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

महेश तपासे यांचे आजोबा माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी आधीच पानिपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे तपासे यांनी सरकार बांधत असलेल्या स्मारकाला पाठिंबा दिला आणि पक्षातील नेत्यांची नाराजी ओढावून घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

बातमी अपडेट होत आहे..

Comments are closed.