आतापर्यंत गोट्या खेळत होतास का? खिशातून हात काढ; रोहित पवार सरकारी अधिकाऱ्यावर भडकले, पाहा VIDE

रोहित पवार: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जतनंतर जामखेडमध्ये देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त आमसभा घेतली. मात्र या सभेदरम्यान एका अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे वातावरण तापले आणि रोहित पवारांनी संतापत त्याला जाहीरपणे झापलं. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, रोहित पवारांच्या वर्तनावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

जामखेडमधील सार्वजनिक समस्या आणि विकासकामांबाबत नागरिकांची थेट माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रशासनासमवेत बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान कार्यकर्त्याने एका कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.पण संबंधित अधिकाऱ्याने गोलमोल उत्तर दिल्यानं रोहित पवार चांगलेच भडकले. त्यांनी स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्याला फटकारलं.

काय म्हणाले रोहित पवार?

संतप्त रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला उद्देशून म्हणाले की, “आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट आहेत का? वेडे आहेत का? तू मिजासखोर होऊ नकोस!” यातच अधिकाऱ्याने खिशात हात घालून उभं राहिल्याचं पाहून रोहित पवारांनी आणखी कडक शब्दांत सुनावलं. “आधी खिशातून हात काढ. तू लय शहाणा झालास वाटतं. लोकं इथे आलेत म्हणजे काहीतरी चुकीचं घडलं आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. काम चांगल्या दर्जाचं व्हायला हवं. तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत. एवढं लक्षात ठेवा, यापुढे गोंधळ चालणार नाही,” अशा शब्दांत रोहित पवारांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

व्हिडिओ व्हायरल, टीकाही सुरू

या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सभास्थळी उपस्थित नागरिकांपैकी काहींनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला, आणि पाहता पाहता तो व्हायरल झाला. या प्रकारामुळे रोहित पवारांच्या थेट आणि आक्रमक शैलीची काही ठिकाणी स्तुती होतेय, तर काहीजण शासकीय अधिकाऱ्यांशी अशा रागीट भाषेत वागणं योग्य नाही, असं म्हणत टीका करत आहेत.

रोहित पवारांचं स्पष्टीकरण

या घटनेनंतर रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की, “भविष्यात कोणत्याही नागरिकाला त्रास होता कामा नये, कामं वेळेत आणि नियमानुसार झाली पाहिजेत, हे आमचं धोरण आहे. जर कुणी हलगर्जीपणा केला, तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. प्रशासनाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “काही अडचणी धोरणात्मक पातळीवरील आहेत, त्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. पण कामात ढिलाई सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=4_cdazqbvvq

आणखी वाचा

Shivaji vategaonkar: ‘एवढा मोठा झाला का तू; तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही…’, बापु बिरूच्या पोराने गोपीचंद पडळकरांना भरला सज्जड दम

आणखी वाचा

Comments are closed.