Ncp sp leader rohini khadse slams state womens commission over vaishnavi hagawane case in marathi
या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावरून आयोगाच्या कामकाजावर तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
Rohini Khadse : मुंबई : सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (23) हिने शुक्रवारी (ता. 16 मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला वैष्णवी नेमकी कोण आहे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु, घटनेच्या काही वेळानंतर सदर महिला ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. पण वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. आता मात्र तिने आत्महत्या केल्याचे समोर येत असले तरी सासरच्या मंडळींकडून तिचा वारंवार छळ होत असल्याची माहिती समोर येत असल्याने ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न समोर येतो आहे. त्यातच या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावरून आयोगाच्या कामकाजावर तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. (ncp sp leader rohini khadse slams state womens commission over vaishnavi hagawane case)
दाल में कुछ काला है…
आपल्या @Maha_MahilaAyog चा कारभार हा असा आहे ‘वराती मागनं घोडं’. बरं बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर टीका केली आहे. काल परवा मा. @ChhaganCBhujbal साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की दाल में कुछ काला है ! ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेले प्रतिक्रिया आहे का ? असा प्रश्नही आमच्या मनात असल्याचे रोहिणी खडसे सांगतात.
हेही वाचा – Ajit Pawar on Vaishnavi Case : माझा याच्याशी काय संबंध? वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अजित पवार काय बोलून गेले
काय आहे प्रकरण?
वैष्णवी हगवणे हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून वांरवार छळ होत होता, ज्यामुळे तिने लग्नानंतर दोन वर्षातच आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हिने ऑगस्ट 2023 पती शशांक याला ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती. पण तेव्हा शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून शशांक व त्याच्या घरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती. शशांक याने वैष्णवीला शिवीगाळ, मारहाण करून माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलून देईन, असे म्हणत घरातून बाहेर काढले.
वारंवार होण्याला छळाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने यापूर्वी 27 नोव्हेंबर 2023 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. आता पतीकडून सुद्धा चारित्र्यावर संशय घेण्यात येऊ लागल्याने तसेच सासरच्यांना सर्व काही देऊनही त्रास कमी न झाल्याने वैष्णवीने आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. या प्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Comments are closed.