Ncp sp leader slams rohini khadse slams mahayuti govt over laziness in vaishnavi hagawane case in marathi


त्यंत निंदनीय असं हे प्रकरण समोर आल्यानंतरही यात अडकलेल्यांविरोधात कारवाई न झाल्याने सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारला जाब विचारला आहे.

Rohini Khadse : मुंबई : सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (23) हिने शुक्रवारी (ता. 16 मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला वैष्णवी नेमकी कोण आहे? याबाबतची माहिती समोर आली नव्हती. परंतु, घटनेच्या काही वेळानंतर सदर महिला ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असल्याची माहिती समोर आली. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. आता तिने आत्महत्या केल्याचे समोर येत असले तरी सासरच्या मंडळींकडून तिचा वारंवार छळ होत असल्याचे कळल्याने ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न समोर येतो आहे. अत्यंत निंदनीय असं हे प्रकरण समोर आल्यानंतरही यात अडकलेल्यांविरोधात कारवाई न झाल्याने सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारला जाब विचारला आहे. (ncp sp leader slams rohini khadse slams mahayuti govt over laziness in vaishnavi hagawane case)

रोहिणी खडसेंचे म्हणणे काय?

वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री @AjitPawarSpeaks दादा आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी या प्रकरणी प्रतिक्रिया द्यायला उशीर केला. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे
@SunilTatkare साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीही हगवणेची हकालपट्टी करण्यास उशीर केला. तसेच एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या @ChitraKWagh यांचीही या प्रकरणी उशीरा प्रतिक्रिया आली, असे खडसे म्हणतात.
याचा अर्थ असा की सत्तेतील सर्वच लोक ‘आपला’ म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, आणि त्यांची पाठराखण केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

वैष्णवी हगवणे हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून वांरवार छळ होत होता, ज्यामुळे तिने लग्नानंतर दोन वर्षातच आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. वारंवार होणाऱ्या या छळाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने यापूर्वी 27 नोव्हेंबर 2023 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. पतीने चारित्र्यावर संशय घेतल्याने तसेच सासरच्यांना सर्व काही देऊनही त्रास कमी न झाल्याने वैष्णवीने जीवनाचा शेवट केला आहे. या प्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सासरा आणि दीर फरार आहेत.



Source link

Comments are closed.